Home Breaking News चाकण परिसरात अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

चाकण परिसरात अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आवाहन

63
0
चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या बिरदवाड़ी गाव परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुण अंदाजे २५ ते ३५ वर्षे वयोगटातील असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह उघड्या जागेत पडलेल्या अवस्थेत आढळून आला असून, मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
मृत व्यक्तीची प्राथमिक ओळख :
वय: २५ ते ३५ वर्षे
रंग: गोरा
केस: काळे व दाट

दाढी: पूर्ण ठेवलेली

विशेष खुण: डाव्या हाताच्या बोटांवर ‘M’ अक्षराचा गोंदलेला टॅटू

कपडे: आकाशी (लाइट ब्लू) रंगाचा शर्ट, करड्या (Grey) रंगाची जिन्स पँट

 या विशिष्ट ओळखीच्या खुणांमुळे नातेवाईक किंवा परिचितांनी ओळख पटवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या घटनेबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (ए.डी.आर.) करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मृत्यू अपघाती आहे की घातपाताचा, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व शक्यता तपासत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, स्थानिक नागरिकांकडून माहिती घेणे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, आपल्या परिसरातील कोणी व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा वरील वर्णनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा. विनोद पाटील (पुलिस निरीक्षक ): 8208843963. चंद्रशेखर मोरखंडे (PSI): 9921118100. | माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुपित ठेवले जाईल व आकर्षक बक्षिस दिले जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.