महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत असताना, सत्ताधारी महायुतीत ‘तिजोरीच्या चाव्या’ या मुद्द्यावरून जोरदार धुसफूस सुरु झाली आहे. राज्याच्या अर्थसत्तेचे श्रेय कोणाकडे? तिजोरीची किल्ली कोणाच्या हातात? कोणत्या पक्षामुळे योजना राबल्या जातात? — या प्रत्येक प्रश्नावर महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर दावा करत आहेत.
निवडणुकीच्या उंबरठ्यावर अशा वक्तव्यांनी फक्त जनतेचे लक्ष वेधले नाही तर आंतरिक मतभेदही पृष्ठभागावर येऊ लागले आहेत. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य आणि त्यावर चाकणकर यांचा प्रहार भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते—
“तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असू देत… पण तिजोरीचा मालक आम्हीच आहोत!”
या विधानाने राजकीय वातावरणात खळबळ माजली. महायुतीतील सहकारी पक्षांना हे वाक्य सरळ संदेश असल्याचं भासत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलं. कुर्डूवाडीतील सभेत चाकणकर म्हणाल्या—
“तिजोरी आमच्या घरची, चाव्या आमच्या हातात! मत तुमचं, पण निधी मात्र आमचा असेल!”
त्या पुढे म्हणाल्या की, विकासकामांसाठी निधी हेच मुख्य साधन आहे आणि राष्ट्रवादीने नेहमीच निधीची लात न लावता विकास साधला आहे. “कुर्डूवाडीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही,” असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मैदानात, प्रचार तापलेला!
राज्यातील सर्वच पक्षांनी स्थानिक निवडणुकांसाठी संपूर्ण शक्तीने प्रचारयुद्ध सुरू केले आहे.
-
मुख्यमंत्री
-
दोन्ही उपमुख्यमंत्री
-
मोठमोठे नेते
