मराठवाड्यातील विनाशकारी पुरामुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असताना, पिंपरीतील एनएसएस वाडीया ग्रुपने मानवी संवेदनांचा हात पुढे करून पूरग्रस्तांना मदतीचा मोठा आधार दिला. 26 सप्टेंबर रोजी केलेल्या आवाहनानुसार, वाडीया ग्रुपचे सदस्य पूरग्रस्त भागात धाव घेऊन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
या मदत उपक्रमात विजय वावरे, राजेंद्र खांदवे, अमित केदारी, नवनाथ नलावडे, प्रदीप सातव, निर्मला नलावडे, भाऊसाहेब गाडेकर, योगेश पवार, प्रतीक्षा जगताप आणि राकेश रावळकर यांनी मनापासून सहभाग घेतला. पूरानंतर घरदार, अन्नधान्य आणि वस्तूंचा मोठ्या प्रमाणात अभाव निर्माण झाल्याने हे किट पूरग्रस्तांसाठी मोठे दिलासादायक ठरले.
स्थानिक नागरिकांनी एनएसएस वाडीया ग्रुपच्या या सामाजिक बांधिलकीचे जोरदार स्वागत केले. मदतकार्यादरम्यान स्वयंसेवकांनी पूरग्रस्त कुटुंबांच्या व्यथा प्रत्यक्ष पाहिल्या आणि त्यांच्या गरजेनुसार आवश्यक सामग्री पोहोचवली. अनेक वृद्ध, महिला आणि लहान मुलांना यामुळे मोठा आधार मिळाल्याचेही दिसून आले.
या उपक्रमासाठी राजेंद्र खांदवे, विजय वावरे, नवनाथ नलावडे आणि अमित केदारी यांचे विशेष सहकार्य लाभले असून, एनएसएस वाडीया समन्वयकांनी संपूर्ण कार्याचे समन्वयन प्रभावीपणे केले.
मानवीय संवेदनांचा सुंदर परिचय देणारा हा उपक्रम पिंपरी-चिंचवड परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.