Home Breaking News शिरूर पोलिसांची १२ तासांत ठोकल्या बेडया! मित्राच्या वादातून खुन, प्रेत पाण्यात टाकून...

शिरूर पोलिसांची १२ तासांत ठोकल्या बेडया! मित्राच्या वादातून खुन, प्रेत पाण्यात टाकून पळून गेलेले आरोपी ताब्यात

33
0
पुणे ग्रामीण भागातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक खुन उघडकीस आला आहे. दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ३:३० वा. शिरूर तालुक्यातील पांजरपोळ येथे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात अशोक तात्या खंडागळे (वय ३१, रा. बोराडेमळा, शिरूर, पुणे) याचे प्रेत सापडले. त्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी श्री. सत्यवान विष्णु पखाले (वय २४, रा. जोशीवाडी, शिरूर, पुणे) यांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलीस तपासात मयताचे शरीर मृत्यूपूर्वीच्या जखमांसह सापडले, ज्यावरून प्राथमिक संशय वाढला. पोस्ट मॉर्टम अहवालानुसार मृत्यू पाण्यात बुडून झाला नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर निष्पन्न झाले की, मयताचा मित्र आकाश ज्ञानेश्वर लोहार (रा. शिरूर, पुणे) आणि त्याचा एक मित्र हे आरोपी आहेत.
तपासात समोर आले की, मयत आणि आरोपी मित्र दारू पित असताना श्रद्धा बार, शिरूर येथे वाद झाला. रागावलेल्या आरोपींनी मोटारसायकलवरून मयत अशोक खंडागळेला प्रितमप्रकाश नगर परिसरातील पांजरपोळच्या मोकळ्या जागेत नेऊन गळा दाबून निर्घुण हत्या केली. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचे प्रेत पाण्यात टाकून पळून गेले.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र. क्र. ७२५/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३, २३८, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण करत आहेत.
या धक्कादायक कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, तसेच पोलीस अंमलदार सचिन भोई, विजय शिंदे, नितेश थोरात, निखील रावडे, निरज पिसाळ, अंबादास थोरे, अजय पाटील यांचा समावेश होता. त्यांनी त्वरित तपास पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला.
गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आकाश ज्ञानेश्वर लोहार सध्या मौजे कौठाळी, तालुका पंढरपूर, जि. सोलापूर येथे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्वरित पुढील कारवाई सुरु केली असून आरोपीच्या ताब्यात येण्यास काही तास शिल्लक आहेत. या प्रकरणाने शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये धक्कादायक प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत.