पुणे : “राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेली २२ कोटींची रोख बक्षिसे ही त्यांच्या कष्टाला दिलेली खरी दाद आहे,“ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल गजबजून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३३१ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंना एकूण २२ कोटी ३१ लाख रुपयांच्या पारितोषिकाची थेट देणगी मिळाली.


