अमरावती | ३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रहार ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. माळेगाव बाजार ग्रामपंचायतीतील अनियमिततेवर कारवाई न झाल्यामुळे हा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
🔹 काय आहे प्रकरण?
१५वा वित्त आयोगाच्या निधीबाबत झालेल्या चौकशीत गटविकास अधिकारी, तेल्हारा यांनी केलेल्या तपासणी अहवालानुसार ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथील सरपंच व सचिव यांनी गंभीर अनियमितता केल्याचे सिद्ध झाले आहे.
-
मूळ दस्तऐवजांमध्ये खोड-तोड (उपरिलेखन) केल्याचे निष्पन्न झाले.
-
शासन निर्णय १.१२.२०१६ नुसार जेम पोर्टलवरून खरेदी न करता थेट साहित्य खरेदी केल्याचेही स्पष्ट झाले.