पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : डुडुळगाव, चौधरीवाडी, वडमुखवाडी आणि निरंजन या भागांतील नागरिकांना अनेक वर्षांपासून पोस्ट सेवेत अडचणींना सामोरे जावे लागत होते. पत्रव्यवहारात होणारा उशीर, न्यायालयीन नोटिसा, सरकारी आदेश आणि नोकरीसंबंधी माहिती उशिरा पोहोचणे यामुळे नागरिकांना आर्थिक व सामाजिक नुकसान सहन करावे लागत होते.
या गंभीर समस्येवर उपाय म्हणून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. डुडुळगाव भागातील नागरिकांना दोन वेगवेगळ्या पिन कोडमुळे (42105 आणि 411081) होत असलेली गैरसोय आता दूर झाली आहे. सर्व पोस्ट सेवा थेट उप-डाकघर (पिन कोड 411010) कडून दिल्या जाणार आहेत.
या बदलामुळे :
डाक सेवा अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे.
नागरिकांना होणारा विलंब आणि त्रास कमी होणार आहे.
महत्त्वाच्या पत्रांचा वेळेवर वितरण सुनिश्चित होईल.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांचा विश्वास वाढेल आणि प्रशासनावरील नाराजी कमी होईल. हा निर्णय हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाढत्या परिसराला दिलासा देणारा ठरेल.
स्थानिक आमदार महेश किसनराव लांडगे यांनी याबाबत आनंद व्यक्त करत सांगितले की, “हा बदल हा केवळ सुविधा नव्हे, तर नागरिकांना न्याय आणि वेळेवर सेवा मिळवून देणारे पाऊल आहे. प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील अडचणी कमी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”