Home Breaking News “वनतारा सेंटरमध्ये माधुरी हत्तीणीचा आनंददायी नवा अध्याय; नव्या मित्रमैत्रिणींसह रमली”

“वनतारा सेंटरमध्ये माधुरी हत्तीणीचा आनंददायी नवा अध्याय; नव्या मित्रमैत्रिणींसह रमली”

6
0
गुजरातमधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात सध्या अनेक रेस्क्यू केलेल्या हत्तींचे संगोपन केले जात आहे. यामध्ये कोल्हापूर येथील प्रसिद्ध नांदणी मठातील *’माधुरी हत्तीणी’*चाही समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी वनतारात आणण्यात आलेल्या माधुरीची काळजी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार घेतली जात असून तिच्यासाठी उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, पौष्टिक आहार आणि सुरक्षित निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वनतारा सेंटरने हत्तींसाठी तयार केलेल्या विशाल परिसरात माधुरी हत्तीण आता पूर्णपणे रुळली आहे. ती इतर हत्तींसोबत सहजपणे संवाद साधत आहे, त्यांच्या कळपात सामील झाली आहे आणि नवीन मित्रमैत्रिणींसह दिवस आनंदात घालवत आहे. टीव्ही ९ च्या टीमने वनतारा सेंटरमध्ये भेट देऊन माधुरीच्या दिनक्रमावर नजर टाकली असता, ती अगदी निरोगी, चपळ व समाधानी असल्याचे दिसून आले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीची नियमित तपासणी केली जाते, तिच्यासाठी विशेष आहार आखला गेला आहे आणि फिजिओथेरपीसारख्या उपचारांचाही समावेश आहे. ज्या प्रकारे तिला नवा कळप, नवे वातावरण आणि प्रेमळ काळजी मिळते आहे, त्यामुळे माधुरी हत्तीण नवे आयुष्य आनंदाने स्वीकारत आहे.
माधुरी हत्तीणीची ही काळजीपूर्वक पुनर्वसन प्रक्रिया एक आदर्श ठरत आहे, जी इतर हत्तींच्या संरक्षणासाठी देखील प्रेरणादायी ठरू शकते. वनतारा सेंटरचा हा उपक्रम प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा मानला जातो.