Home Breaking News दिल्ली हादरली! पुन्हा ५० हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

दिल्ली हादरली! पुन्हा ५० हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी

36
0
दिल्लीमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा भीतीचं सावट पसरलं. राजधानीतील तब्बल ५० हून अधिक शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्याने पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही घटना या आठवड्यातील दुसरी घटना असून याआधी सोमवारी ३२ शाळांना अशाच प्रकारे धमक्या मिळाल्या होत्या.
मलविया नगर, नजफगड या भागातील काही शाळांसह DAV Public School, Faith Academy, Doon Public School, Sarvodaya Vidyalaya यांसारख्या नामांकित शाळांना “Terrorizers 111” या नावाने धमकी पाठवण्यात आली. धक्कादायक म्हणजे, धमकीसोबत २५ हजार अमेरिकन डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.
सकाळपासून दिल्ली पोलिस, बॉम्ब स्क्वॉड आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून Sarvodaya Kanya Vidyalaya, हौज राणी परिसरात तातडीने तपासणी मोहीम राबवली. विद्यार्थी व शिक्षकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून शाळांच्या आवारात कसून तपासणी सुरू आहे.
या धोकादायक प्रकारामुळे पालक चिंतेत असून मुलांच्या सुरक्षेबाबत सरकार आणि प्रशासनाकडे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी झालेल्या धमक्या फक्त खोट्या निघाल्या असल्या तरी सततचे असे प्रकार शिक्षण व्यवस्था आणि मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत.
 पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून धमकी देणाऱ्या मेलच्या स्त्रोतांचा शोध घेण्यासाठी सायबर सेलही सक्रिय झाली आहे.
 दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावलं उचलावीत आणि अशा खोडसाळ कृत्यांना आळा बसावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
दिल्लीतील ५० हून अधिक शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; पालक व विद्यार्थ्यांत भीतीचं सावट!