Home Breaking News ‘हिंजवडी आयटी पार्क’सह सात गावांचा समावेश लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत

‘हिंजवडी आयटी पार्क’सह सात गावांचा समावेश लवकरच पिंपरी-चिंचवड महापालिकेत

49
0
मुख्यमंत्र्यांकडून कार्यवाहीचे आदेश जारी; महेश लांडगे दादांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त
पिंपरी-चिंचवड – महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय ओळख असलेला ‘हिंजवडी आयटी पार्क’ आणि त्याच्याशी जोडलेली सात गावं – हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांभे, सांगवडे आणि गहुंजे – यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी यासाठी संबंधित शासकीय विभाग प्रमुख व लोकप्रतिनिधींसह स्वतंत्र बैठक घेऊन स्पष्ट दिशा दिली आहे. तसेच तातडीने आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. या निर्णयामुळे हिंजवडी परिसरातील पायाभूत सुविधांच्या त्रुटींवर कायमचा उपाय होणार असून, येथील नागरी व आयटी वस्तीचा सर्वांगीण विकास वेग घेतोय, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 आयटी हबचा अडथळा दूर होणार – नागरिक आणि उद्योजकांचा दिलासा
हिंजवडी आयटी पार्क हा भारतातील प्रमुख आयटी केंद्रांपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, मलनि:सारण व प्रशासनाच्या समन्वयाच्या समस्यांमुळे नागरिक व उद्योजक त्रस्त होते. आता या भागाचा थेट महापालिका क्षेत्रात समावेश झाल्यास स्थिर आणि सुसंगत नागरी सुविधा, नियोजनबद्ध विकास आणि वेगवान निर्णय प्रक्रिया अपेक्षित आहे.
 महेश लांडगे दादांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना आभार व्यक्त
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने आणि सक्रिय नेतृत्वामुळे हा निर्णय झाला असून, आता पिंपरी-चिंचवडचा विस्तार अधिक शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि जनहितकारी मार्गावर जाईल,” असे लांडगे दादांनी स्पष्ट केले.
 आगामी काळात काय अपेक्षित?
महापालिकेचा प्रशासकीय आराखडा विस्तृत होणार
हिंजवडी व जवळच्या गावांमध्ये दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार
आयटी उद्योजक, कर्मचाऱ्यांना विश्वासार्ह नागरी सुविधा
वाहतूक, आरोग्य, पाणी, मलनि:सारण, कचरा व्यवस्थापन यामध्ये सुधारणा
समाविष्ट गावांचा विकास आराखड्यात समावेश