Home Breaking News विधान परिषदेत आ. अमित गोरखे यांची प्रभावी उपस्थिती; स्थानिक ते राज्यस्तरावरील ज्वलंत...

विधान परिषदेत आ. अमित गोरखे यांची प्रभावी उपस्थिती; स्थानिक ते राज्यस्तरावरील ज्वलंत प्रश्नांवर मांडले ठोस मुद्दे

20
0
प्रतिनिधी – श्रावणी कामत, पिंपरी, पुणे 
पिंपरी-चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत अत्यंत संयमित, अभ्यासपूर्ण आणि ठोस मुद्द्यांवर चर्चा करत स्थानीय तसेच राज्यस्तरीय महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले. विविध विभागांमधील चुकीच्या धोरणांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आणि नागरिकांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.
आ. गोरखे यांनी “प्रतिभा सेतू”, SC प्रमाणपत्र गैरवापर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, DP आराखडा त्रुटी, खासदार रुग्णालयातील आयुर्वेदिक सेवा, भटक्या कुत्र्यांचा त्रास, बालगुन्हेगारी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आवाज उठवून सरकारला उत्तरादायित्वाच्या दिशेने खेचले.
तालिका सभापती पदाचा सन्मान ही आयुष्यातील सर्वोच्च आनंदाची घटना असल्याचे सांगत गोरखेंनी आपल्या विधानपरिषदेतील भूमिकेची माहिती दिली. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदींच्या समोर हा सन्मान मिळाल्याने त्यांना मोठा आत्मविश्वास व प्रेरणा मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
त्यांनी मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे –
🔹 पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा (DP) रद्द करावा, हा बिल्डर लॉबीचा कट असल्याचा ठपका
🔹 “प्रतिभा सेतू” योजना महाराष्ट्रात सुरू करावी
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पोलीस स्टेशन आरक्षण रद्द करून माता रमाई स्मारक विकसित करावे
🔹 SC सवलतीचा गैरवापर करणाऱ्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे
🔹 जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदे तातडीने भरावीत
🔹 सांस्कृतिक कार्यक्रम अचानक रद्द केल्यामुळे कलाकारांचे नुकसान टाळण्यासाठी धोरण तयार करावे
🔹 पिंपरी-चिंचवडमधील YCM रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार पुन्हा सुरू करावेत
🔹 मावळ तालुक्यातील उर्से येथील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची SIT चौकशी करावी
🔹 स्मशानभूमीत भेदभाव रोखण्यासाठी अधिकारी थेट जबाबदार धरणे व SC/ST कायद्यांतर्गत कारवाई करावी
🔹 PMT बसमध्ये प्राथमिक सुरक्षा साधनांची अंमलबजावणी करावी
🔹 लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी ठराव संमत करावा
🔹 भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र धोरण व निधीची तरतूद करावी
आ. गोरखे यांनी अनेक समाजघटकांचे प्रश्न आणि मागण्या योग्य त्या स्वरूपात मांडल्या आणि संबंधित मंत्र्यांकडून उत्तरं व आश्वासनं मिळवली. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, त्यांचा आवाज आता विधानमंडळात ठामपणे पोहचतो आहे.
यावेळी पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सुजाताताई पालांडे, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, महेश कुलकर्णी, ॲड. शेडगे, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, राजू दुर्गे, संदीप वाघेरे, धर्मा वाघमारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय, विकास आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेसाठी आ. अमित गोरखे यांची ठोस भूमिका!