Home Breaking News मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड! स्टेट बँक फसवणूकप्रकरणी ईडीकडून ९.५६ कोटींची मालमत्ता परत!

मोठा आर्थिक गैरव्यवहार उघड! स्टेट बँक फसवणूकप्रकरणी ईडीकडून ९.५६ कोटींची मालमत्ता परत!

18
0
नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाशी (SBI) संबंधित तब्बल ८५.३९ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ९.५६ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता परत केली असून, ही कारवाई कोलकात्याच्या विशेष पीएमएलए न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
फसवणुकीची संपूर्ण कहाणी
कोलकातास्थित ग्लोबल लॉजिस्टिक्स लिमिटेड या कंपनीने व्होल्वो आणि मर्सिडीज बस खरेदी करण्यासाठी स्टेट बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, वास्तविक बस खरेदी न करता बनावट बँक खाती व गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारांच्या साहाय्याने तब्बल ८५.३९ कोटी रुपये हडप करण्यात आले.
या फसवणुकीचा CBI कडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आधारे ED ने मनी लाँड्रिंगचा तपास हाती घेतला आणि त्यात १०.८६ कोटी रुपयांचा संशयास्पद निधी आढळून आला. त्यामुळे ED ने दोन तात्पुरत्या आदेशांद्वारे मालमत्ता जप्त केली होती.
न्यायालयाचा हस्तक्षेप आणि निर्णय
या प्रकरणात कंपनीवर राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडून (NCLT) लिक्विडेशन प्रक्रिया लागू करण्यात आली आणि लिक्विडेटरची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर PMPLA कायद्याच्या कलम 8(8) अंतर्गत मालमत्ता परत मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
कोलकाता विशेष पीएमएलए न्यायालयाने याचिका मान्य करत ईडीला मालमत्ता परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ED ने १० स्थावर व ९ जंगम मालमत्ता अधिकृत लिक्विडेटरकडे सुपूर्त केल्या.
महत्त्वाचे मुद्दे –
आर्थिक फसवणूक प्रकरणात यंत्रणांची तातडीची कारवाई
ईडीची तात्पुरती मालमत्ता जप्ती न्यायालयाच्या आदेशाने परत
सरकारी बँकेच्या कर्जाचा गैरवापर करुन लाखो नागरिकांची फसवणूक
या प्रकरणाने पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रातील कर्जवाटप व नियमन प्रक्रियेवर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.