Home Breaking News मुजोर खासदाराला खडेबोल सुनावणाऱ्या महिला खासदारांचे मनसेकडून कौतुक; अधिवेशनानंतर होणार भव्य सत्कार!

मुजोर खासदाराला खडेबोल सुनावणाऱ्या महिला खासदारांचे मनसेकडून कौतुक; अधिवेशनानंतर होणार भव्य सत्कार!

9
0
नवी दिल्लीतील संसद भवनात नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मुजोर खासदार निशिकांत दुबेंच्या वागणुकीविरोधात ठामपणे आवाज उठवणाऱ्या तीन महिला खासदारांनी देशभरात खळबळ उडवून दिली आहे. या महिलांनी केवळ महिलांच्या सन्मानासाठी नव्हे, तर लोकशाहीच्या मूल्यांसाठी देखील अत्यंत धैर्याने जाब विचारला.
या महिला खासदारांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश जाधव यांनी जाहीर केलं की, “अधिवेशन संपल्यानंतर या महिला खासदार आपल्या मतदारसंघात परततील, त्यावेळी मनसे त्यांचा भव्य स्वागत-सत्कार करेल.”
या घटनेमुळे महिलांच्या सहभागाला आणि त्यांच्या राजकीय सजगतेला अधिक बळ मिळाले आहे. महिलांचा आवाज दबवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ही ठाम आणि निर्भीड भूमिका सणसणीत उत्तर ठरत आहे. मनसेनेही या निर्णयाने महिला सन्मानाच्या बाबतीत आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली आहे. मनसेचे हे पाऊल राजकीय वर्तुळात एक सकारात्मक संदेश देणारे ठरले आहे.