पुणे – “हा हल्ला पूर्वनियोजित कट होता. सरकार पुरस्कृत होता. चंद्रशेखर बावनकुळे हेच या कटाचे मास्टरमाईंड आहेत!” – अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी थेट सरकारला इशारा दिला की, “सरकारने योग्य ती कारवाई न केल्यास आम्ही संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने जशास तसे उत्तर देऊ!”
प्रमुख मुद्दे – ▪️ गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे निषेध नाही तर नियोजनबद्ध कट ▪️ आरोपी पॅरोलवर बाहेर असलेले व बाहेरच्या राज्यातील असल्याचा गंभीर आरोप ▪️ दीपक काटेचा उल्लेख करत, “तो बावनकुळे यांचा ‘गॉडफादर’ मानतो” – असा थेट आरोप ▪️ हल्लेखोरांकडे घातक शस्त्रं, पण अक्कलकोट पोलिसांनी अदखलपात्र गुन्हे दाखल ▪️ फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी ▪️ “लोकशाहीविरोधी विचारांच्या शेवटाची ही सुरुवात ठरेल,” – गायकवाड यांचा गंभीर इशारा
“संभाजी ब्रिगेडचा इतिहास विसरू नका. आम्ही कुणाचं अन्याय सहन करत नाही. न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, रेखा कोंडे, शाम कदम, प्रशांत कुंजीर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात नव्याने खदखद निर्माण करणारा हा गंभीर आरोप आणि इशारा लक्षवेधी ठरत आहे.