Home Breaking News प्रहार जनशक्ती पक्ष,तेल्हारा तालूका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचा 15...

प्रहार जनशक्ती पक्ष,तेल्हारा तालूका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचा 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहनाचा इशारा!!!

388
0

प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा तालूका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचा 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहनाचा इशारा. विद्यमान विभागिय आयूक्त अमरावती यांनी मां मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला यांना 30 दिवसाच्या आत संबंधित तक्रारीचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते परंतू 150 दिवसांच्या वर कालावधी उलटूही अहवाल हां आयूक्त अमरावती यांचे कड़े सादर झाला नाही व पानंद शेतरसत्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चे आदेश मां महसुल मंञी चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी 13.6.2025 रोजी जिल्हाधिकारी साहेबांना दिला होता परंतू आदेशाची अमलबजावणी होत नसल्यामुळे आत्मदहन करण्याचे निवेदन द्यावें लागले

🙏
1, माळेगाव बाजार येथील काटेल कोलद पानंद शेतरसत्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
2,माळेगाव ते तेल्हारा रोडवरील शेरी या गावाजवडील नवीन फुल बांधण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्याकरिता खुप मोठी अडचण येत असून शेतकरी यांना कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था करून द्यावी.
3, माळेगाव बाजार ग्रामपंचायत मध्ये 14 वा वित्त आयोग व 15 वा वित्त आयोगामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी याकरिता आज माननीय जिल्हाधिकारी साहेब अकोला व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला व पंचायत विभाग सिओ जि प अकोला यांना निवेदन देण्यात आले आहे.
15 ऑगस्ट 2025 च्या आधी सर्व तक्रारीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहन करण्याचा इशारा आखरे यांनी निवेदनातून दिला आहे.