Home Breaking News पुण्यात सायबर चोरांचा कहर! CBI-ED अधिकारी असल्याचा बनाव करून ६५ वर्षीय नागरिकाची...

पुण्यात सायबर चोरांचा कहर! CBI-ED अधिकारी असल्याचा बनाव करून ६५ वर्षीय नागरिकाची २६.५० लाखांची फसवणूक | पुणे पोलिसांकडून तपास सुरू

22
0
पुणे | दिनांक – १० जुलै २०२५
सायबर गुन्ह्यांचे जाळं दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चाललं असून, आता हे चोरटे थेट सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) अधिकाऱ्यांच्या नावाने नागरिकांना गंडवत आहेत.
पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी रचली फसवणुकीची शक्कल?
हरि अनंतराव पाटील (वय ६५, रा. खराडी) यांच्याशी २२ जून ते ९ जुलै या कालावधीत सायबर ठगांनी WhatsApp चॅटच्या माध्यमातून संपर्क केला.
➡️ त्यांनी स्वत:ला ईडी आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवले.
➡️ त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी खोटे आरोप लावत, अटक होईल अशी भीती दाखवली.
➡️ त्यांच्या आधार कार्डाचा बनावट वापर करून बनावट कागदपत्रे पाठवून मानसिक दबाव टाकला.
➡️ मग त्यांना “प्रकरण मिटवण्यासाठी” २६.५० लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले.
 गुन्हा दाखल, तपास सुरू
या प्रकारानंतर पीडित पाटील यांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
➡️ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
➡️ चोरट्यांनी वापरलेली मोबाईल क्रमांक, बँक खाते आणि आयपी ऍड्रेस तपासण्याचे काम सायबर सेलकडून सुरू आहे.
 नागरिकांसाठी पोलिसांचा इशारा
पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे:
कोणताही शासकीय अधिकारी अशा पद्धतीने WhatsApp वर संपर्क करत नाही.
फसवणुकीसाठी दडपशाही, बनावट ओळख, आणि भिती दाखवणे हे सामान्य शक्कल आहेत.
कोणतीही शंका वाटल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.