Home Breaking News गणेशभक्तांसाठी आनंदवार्ता! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची 5000 जादा बसेस, महिलांना ५०%...

गणेशभक्तांसाठी आनंदवार्ता! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची 5000 जादा बसेस, महिलांना ५०% तर ज्येष्ठांना १००% सवलत – मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

19
0
मुंबई | 15 जुलै 2025 :- गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी मोठी बातमी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी समोर आली आहे. राज्यातील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले की, एसटी महामंडळ 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सवासाठी 5000 जादा बसेस सोडणार आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले, “गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे प्रत्येक गणेशोत्सवात चाकरमान्यांची अडचण होऊ नये यासाठी एसटी महामंडळ नफा-तोट्याचा विचार न करता जादा बससेवा पुरवते.”
🔸 आरक्षण सुरू: २२ जुलैपासून
या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाईटवर सुरु होणार आहे. तसेच, MSRTC Bus Reservation App आणि स्थानिक बसस्थानकांवर देखील आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल.
🔸 महिला आणि ज्येष्ठांसाठी खास सवलत
 ज्येष्ठ नागरिकांना १००% तिकीट सवलत
 महिलांना ५०% सवलत
 ही सवलत आरक्षित बसगाड्यांवर लागू असेल.
🔸 2024 तुलनेत वाढलेली बससंख्या
मागील वर्षी 4300 जादा बसेस उपलब्ध होत्या, तर यंदा हा आकडा 5000 वर पोहोचवण्यात आला आहे. ही वाढ चाकरमान्यांच्या वाढत्या गर्दीचा आणि त्यांच्या गरजांचा विचार करून करण्यात आली आहे.
🔸 बसस्थानकांवर २४x७ देखरेख
गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक बसस्थानकावर आणि थांब्यावर एसटीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.
कोकणातील महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथके तैनात केली जाणार आहेत, जे आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत करतील.
🔸 कोकणवासीय आणि चाकरमान्यांची सकारात्मक प्रतिक्रिया
कोकणातील गणेशभक्तांनी या निर्णयाचे स्वागत करत राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत. अनेकांनी “गणरायाच्या आगमनाची तयारी आता जोरात सुरू झाली” असे सांगितले.