Home Breaking News उच्चभ्रू सोसायटीमध्ये 25 वर्षीय तरुणीवर घरात घुसून बलात्कार; कुरिअर बॉयची विकृती, मोबाईलमध्ये...
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आरोपीने आपला चेहरा झाकून सोसायटीमध्ये कुरिअर बॉय असल्याचा बनाव करत प्रवेश केला. पीडित तरुणीला ‘तुमचं कुरिअर आहे, सही करा’ असं सांगितलं. तरुणीने ‘माझं काही कुरिअर नाही’ असं सांगितल्यानंतरही आरोपीने सही लागते म्हणून आग्रह केला. विश्वास ठेवून तरुणीने घराचा सेफ्टी दरवाजा उघडताच आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि बेशुद्धतेच्या स्थितीत तिच्यावर अत्याचार केला.