Home Breaking News ‘यार बिना चैन कहा रे…’ सुरेल मैफलीत रसिक चिंब चिंब! संगीत, सादरीकरण...

‘यार बिना चैन कहा रे…’ सुरेल मैफलीत रसिक चिंब चिंब! संगीत, सादरीकरण आणि आठवणींचा अविस्मरणीय अनुभव

69
0
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात रविवारी, दिनांक २२ जून २०२५ रोजी विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘यार बिना चैन कहा रे…’ या सुमधुर हिंदी – मराठी गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुपारच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींसह सुरू झालेल्या या सुरेल संध्याकाळी श्रोते अक्षरशः चिंब झाले. रसिकांवर गीतांचा, आठवणींचा आणि स्वरांचा वर्षाव झाला.
कार्यक्रमात दिशा सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिन साठे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, साहित्यिक प्रदीप गांधलीकर, जी. बी. कुलकर्णी, नूतन कुलकर्णी, प्रशांत वैद्य, मोहन भस्मे, विजय सहारे, कांतीलाल जानराव आदी मान्यवर उपस्थित होते.
संगीताचा प्रारंभ गणेशस्तवनानंतर ‘माउली माउली…’ या भक्तिरचनेने झाला. त्यानंतर सुरु झालेली गीतांची बरसात थेट श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्शून गेली. विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शुभांगी पवार, नेहा दंडवते, मल्लिकार्जुन बनसोडे, विलास खरे, चंद्रकांत हिवरकर, अरुण सरमाने, स्मिता गायकवाड, सचिन जवंजाळ, अश्विनी जवंजाळ, सीमा पोडाला, अनिल जंगम, सतीश कापडी, प्रीती गायकवाड आणि पिनाक भिंगारे या गायकांनी एकल आणि युगुल गीतांमधून गायनाचे अनोखे पर्व उभारले.
मैफलीतील काही ठळक क्षण –
पिनाक गायकवाड यांचे ‘लागा चुनरी में दाग…’ या शास्त्रीय छटा लाभलेल्या गीताचे दमदार सादरीकरण, वन्स मोअरची उत्स्फूर्त मागणी.
‘देखा ना हाय रे…’, ‘ख्वाब हो तुम या…’, ‘ओ मेरे दिल की चैन…’, ‘सोला बरस की…’ यांसारख्या भावविवश करणाऱ्या एकल गीतांनी रसिकांच्या हृदयाला हात घातला.
‘प्यार किया नहीं जाता…’, ‘चढती जवानी…’, ‘कोयल सी तेरी बोली…’ या युगुल स्वरांनी वातावरण रोमँटीक केलं.
जवंजाळ दांपत्याने ‘यार बिना चैन कहा रे…’ या शीर्षकगीतातून मैफलीला विशेष उंची दिली.
‘ढगाला लागली कळ…’ या मराठी गीताचे साभिनय सादरीकरण प्रेक्षागृहात जल्लोष निर्माण करणारे ठरले.
कुमार शानू विशेष –
‘यारा हो यारा…’, ‘सुन बेलिया…’, ‘टिप टिप बरसा पानी…’, ‘लाल दुपट्टेवाली…’ अशा एकाहून एक सुपरहिट गाण्यांनी श्रोते थिरकले.
 शेवटी, ‘तुम अगर मुझको ना चाहो…’ या गाण्याच्या समूह सादरीकरणाने संपूर्ण मैफलीचा मनोहारी समारोप केला. हा क्षण क्षणात अनुभवणारा आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरला.
संयोजन: विनायक कदम
संकल्पना: नंदकुमार कांबळे
ध्वनिसंयोजन: शैलेश घावटे
दृकश्राव्य चित्रण: सौमिल घावटे
छायाचित्रण: सुहास चांगण, आकाश गाजूल
दृश्यनिर्मिती: विक्रम क्रिएशन
निवेदन: घनश्याम आगरवाल
 या मैफलीने रसिकांच्या हृदयात आठवणींची एक सुरेल मैफल चिरकाल जपली जाईल यात शंका नाही.