पुणे महानगरपालिका,उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने सन १९९२ पासून दिपावलीच्या निमित्ताने किल्ले स्पर्धा आयोजित केल्या जातात. वाढत्या शहरीकरणामुळे, राहणीमानात झालेल्या बदलामुळे मुलांना. किल्ले करण्यासाठी उपलब्ध होणारी अपुरी जागा असलेने, मुलांना जागा उपलब्ध करून आपल्याकडे असलेल्या अनमोल किल्ल्यांचा पुन्हा अभ्यास . करता यावा, त्याबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी, इतिहास – भुगोलाची आवड वृध्दींगत व्हावी, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने पुणे महानगरपालिका प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करीत आहे. यावर्षीही दिनांक २८/१०/२०२४ ते ०६/११/२०२४ या कालावधीमध्ये, ३० वे किल्ले स्पर्धा व प्रदर्शन छ. संभाजीराजे उद्यान,जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे, याठिकाणी आयोजित करणेत आलेले असून स्पर्धेमध्ये एकूण तीन विभाग करणेत आलेले आहेत.
यावर्षी किल्ले स्पर्धा व प्रदर्शनामध्ये एकूण ४९ स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. सदरहू स्पर्धेच्या किल्ल्यांचे परिक्षण इतिहास व भूगोल तज्ञ मा. श्री. जगजीवन काळे, मा. श्री. कैलास चौधरी, मा. श्री. मयुरेश लव्हे, मा. श्री. प्रसाद पवार, मा.श्री. अमोल उणेचा, मा. श्री. महेश शिंदे, मा. श्री. संजय साळुंके. मा. श्री. मिलिंद अंबिके यांनी केलेले आहे.
किल्ले स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक विभाग व गटामध्ये प्रथम क्रमांकास र.रू. ५००१ – व द्वितीय क्रमांकास र.रू.३००१/– व तृतीय क्रमांकास र.रू. २००१/– व सर्वोत्कृष्ठ किल्ल्यास र. ७००१/– रूपयाचे पारितोषिक देणेत येणार असून, यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ मा. डॉ राजेन्द्र ब भोसले, महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे हस्ते पार पडला. सदर कार्यक्रमास मा श्री ज्ञानेश्वर मोळक, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मा. श्री. संदिप कदम, उपायुक्त, पुणे महानगरपालिका, भूगोल तज्ञ श्री. डॉ. सुरेश गरसोळे, पिनॅकल संस्थेचे योगेश बोबडे व अतुल चंगेडीया, तसेच मा. श्री. अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक, मा.श्री.साळुंके ,कार्यकारी अभियंता (उद्यान) उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये जंजिरा, बाणकोट, रत्नदुर्ग, रायगड, नळदुर्ग, विजयदुर्ग, हडसर, पद्मदुर्ग, अजिंक्यतारा, शिवनेरी, पन्हाळगड, देवगड, सालेर, पुरंदर, कुलाबा, राजगड, सिंहगड, प्रतापगड, लोहगड, सिंधुदुर्ग, इ. किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रदर्शनामध्ये वरील ठिकाणी महाराष्ट्रातील विविध किल्ले नागरिकांना पाहता येणार आहेत. किल्ल्यांबाबतच्या अधिक माहितीसाठी किल्ल्यांचे नकाशे, किल्ल्यांवर व पर्यावरणावर आधारित घोषवाक्य इत्यादी माहिती सदरचे किल्ले पहाताना पहावयास मिळणार आहे. सदरचे प्रदर्शन हे दिनांक २८/१०/२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वा. नंतर ते दिनांक ०६/११/२०२४ या कालावधीमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.