Home Breaking News परप्रांतीय मुलींना आमिष, 28 वेळा रूम बुकिंगचा आरोप; प्रांजल खेवलकर अडचणीत

परप्रांतीय मुलींना आमिष, 28 वेळा रूम बुकिंगचा आरोप; प्रांजल खेवलकर अडचणीत

72
0
पुणे – भाजप नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप समोर येत असून, हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे व गंभीर होत चालले आहे. बीडमधील ‘सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था’च्या संस्थापिका प्रज्ञा खोसरे यांनी राज्य महिला आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, खेवलकर यांनी पुण्यातील खराडी भागातील एका हॉटेलमध्ये तब्बल २८ वेळा स्वतःच्या नावाने रूम बुक करून परप्रांतीय मुलींना आमिष दाखवले, असा दावा करण्यात आला आहे.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणात तातडीने दखल घेतली असून, हे प्रकरण संघटित गुन्हेगारी व मानवी तस्करीच्या दिशेने झुकते की काय, याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांना याप्रकरणी मानव तस्करी विरोधी पथक व सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून त्वरित तपास करण्यास सांगितले आहे.
🔸 मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट व व्हिडीओ
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमधून काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडले आहेत. विशेष म्हणजे, एका मुलीचा व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवताना त्यांनी ‘ऐसा माल चाहिए’ असा घृणास्पद मेसेज केला आहे. या चॅटमुळे प्रकरणात खळबळ उडाली असून, खेवलकर यांची भूमिका अधिकच संशयास्पद ठरत आहे.
🔸 महिला आयोगाची गंभीर भूमिका
महिला आयोगाने या प्रकरणातील मानव तस्करी, महिलांचा छळ व संघटित गैरकृत्ये यांची दखल घेतली असून, पोलिसांकडून संपूर्ण कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
🔸 राजकीय वातावरणात खळबळ
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, भाजप नेत्या रोहिणी खडसे यांच्यावरही दबाव वाढला आहे. अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रकरणात तातडीने न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत आहेत.