Home Breaking News ‘‘दस का दम’’ने सभागृह गाजवले! विकासाभिमुख हिंदुत्वाचा अजेंडा ठामपणे मांडणारे आमदार महेश...

‘‘दस का दम’’ने सभागृह गाजवले! विकासाभिमुख हिंदुत्वाचा अजेंडा ठामपणे मांडणारे आमदार महेश लांडगे ठरले अधिवेशनाचे लक्षवेधी चेहरे

33
0
मुंबई | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला असला, तरी या अधिवेशनात सर्वाधिक लक्ष वेधणारा चेहरा ठरला तो पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे. विकास, वाहतूक, पर्यावरण, धर्म आणि स्थानिक समस्यांवरील ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ‘दस का दम’ या संज्ञेची प्रचीती त्यांनी सभागृहात दिली.
 सभागृहात ठाम भूमिका: स्थानिक प्रश्नांवर आक्रमक आणि अभ्यासपूर्ण मांडणी
अधिवेशनात महेश लांडगे यांनी एकूण १० ठळक मुद्दे सभागृहात मांडले. पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी, चाकण औद्योगिक पट्ट्यातील इन्फ्रास्ट्रक्चरची अडचण, डुडुळगावचा विकासप्रश्न, घरपट्टी माफी, नदी सुधार प्रकल्प, रेडझोनचे अडथळे, फ्री-होल्ड प्रश्न, विद्युत समस्यांचे निराकरण अशा मुद्द्यांवर प्रामाणिक आणि ठोस चर्चा करून शासनाच्या यंत्रणेला खडबडून जागं केलं.

‘अनक्लॉग हिंजवडी’ मोहिमेला चालना
हिंजवडी आयटी पार्कच्या समस्यांसंदर्भात आयटी व्यावसायिक आणि सोसायटी प्रतिनिधींनी केलेल्या मागणीला महेश लांडगे यांनी गंभीरतेने घेत तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावली. यानंतर भूमकर चौक आणि माण परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे हिंजवडी वाहतूक कोंडीतून मुक्त होण्याच्या दिशेने पाऊल टाकले गेले आहे.
 भूमिपुत्रांना न्याय – फ्री होल्ड, रेडझोनमुक्तीची परखड मागणी
प्रारूप विकास आराखड्यावर चर्चा करताना, शहरातील भूमिपुत्रांचे हक्क अबाधित राहावेत, धार्मिक स्थळांना आरक्षण लागू नये, यासाठी लांडगे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. मोशी, रुपीनगरमधील मंदिरांवर आरक्षण टाकू नये, अशी मागणी करताना त्यांनी गोरगरीबांची घरे पाडून विकास नको, असा स्पष्ट संदेश दिला.
 वीज, रस्ते आणि सरकारी इमारतींचा पुनर्विकास यावर ठोस पुढाकार
डुडुळगाव येथील रस्त्याच्या विकासासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्यामार्फत NOC मिळवण्यासाठी पाठपुरावा, भोसरी, दिघी आणि चऱ्होलीसाठी नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी मिळवणे, जीर्ण शासकीय इमारतींचा महापालिकेकडे हस्तांतरण आणि त्यांचा पुनर्विकास यावर ठोस कामगिरी त्यांनी केली.
 जीएसटी फसवणूक आणि धर्मांतरबंदीवर कठोर आवाज
राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या धर्मांतरबंदी विधेयकावर लांडगे यांनी अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केले. ‘‘प्राण गेला, पण धर्म नाही’’ म्हणणाऱ्या ऋतुजा राजगे यांचा उल्लेख करत राज्यात तात्काळ धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याची मागणी केली. मोहम्मद रेहमानी व GST फसवणूक रॅकेटवर मोक्का लावावा, अशी मागणी करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दाही जोरात उपस्थित केला.
 ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ हीच आमची दिशा!
अधिवेशन संपल्यावर प्रतिक्रिया देताना महेश लांडगे म्हणाले, ‘‘विकासाभिमुख हिंदुत्व हीच आमच्या राजकीय व सामाजिक जीवनाची ‘लाइन ऑफ ॲक्शन’ आहे. देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु त्याचवेळी पायाभूत विकास, पर्यावरण संवर्धन आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणं हेही आमचे ब्रीद आहे.’’
 आमदार महेश लांडगे ठरले ‘अधिवेशनातील नायक’
विविध मुद्द्यांवर ठोस चर्चा, शासनदरबारी वेळ घेऊन बैठका, सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक लढा आणि त्याचवेळी अभ्यासपूर्ण मांडणीमुळे महेश लांडगे यांची ओळख एक अभ्यासू, जिद्दी व जनतेसाठी लढणाऱ्या आमदार म्हणून अधिवेशनात ठळकपणे उठून दिसली.