Home Breaking News धक्कादायक घटना! दिल्लीहून आलेल्या ६६ वर्षीय व्यापाऱ्याला भीमाशंकर दर्शनानंतर जंगलात नेऊन पिस्तुलाचा...

धक्कादायक घटना! दिल्लीहून आलेल्या ६६ वर्षीय व्यापाऱ्याला भीमाशंकर दर्शनानंतर जंगलात नेऊन पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले

31
0
पुणे, १४ जुलै : दिल्लीहून पुण्यात आलेल्या ६६ वर्षीय व्यापाऱ्याला दर्शनासाठी भीमाशंकर नेल्यानंतर जंगलात नेऊन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित व्यापाऱ्याने बंदगाईन पोलिसांत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेशचंद चौहान (रा. बदरपूर, दक्षिण दिल्ली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ते पुणे रेल्वे स्थानकाजवळील पार्सल गेटवर पोहोचले. तिथे एका रिक्षाचालकाने भीमाशंकर दर्शनाची व्यवस्था करून देण्याचा दावा करत चौहान यांना नेले. दर्शनानंतर परतीच्या प्रवासात भीमाशंकरच्या जंगलात रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली आणि पिस्तुलाचा धाक दाखवत चौहान यांना खाली उतरवले.
पिस्तुलाचा धाक दाखवत जीव मारण्याची धमकी
रिक्षाचालकाने चौहान यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील मोबाइलद्वारे गुगल पे द्वारे ₹४,५०० आणि खिशातील ₹१५,००० असा एकूण ₹१९,५०० जबरदस्तीने घेतले. ही घटना अतिशय धक्कादायक असून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु
पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी वेगाने तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ही घटना राज्यातील पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित करते. अशा घटनांमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.