Home Breaking News “नागरिकांचा विरोध असलेली दारूची दुकानं कायमची बंदच झाली पाहिजेत!” – महेश दादांचा...

“नागरिकांचा विरोध असलेली दारूची दुकानं कायमची बंदच झाली पाहिजेत!” – महेश दादांचा निर्धार, नागरिकांच्या भावना सर्वोच्च!”

66
0
पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरात अनेक भागांमध्ये दारू दुकानांविरोधात स्थानिक नागरिक, महिला मंडळं आणि युवा संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे (महेश दादा) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “जिथे जिथे नागरिकांचा विरोध आहे, तिथे ती दारूची दुकानं कायमची बंद झाली पाहिजेत!”

दादांचा ठाम संदेश प्रशासनाला
महेश लांडगे यांनी म्हटलं की, “दारूच्या दुकानांमुळे महिला, विद्यार्थी, तरुण पिढी आणि संपूर्ण परिसर त्रस्त होतो. अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. जेव्हा संपूर्ण परिसर याला विरोध करत आहे, तेव्हा त्या दुकानांची परवानगी सरकार किंवा प्रशासनाने घेणं म्हणजे जनतेच्या इच्छेला विरोध करणं आहे.”
 महिलांचा आवाज, दादांची पाठिंबा
सामाजिक संघटना आणि महिला बचतगटांनी वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदनं दिली असून, “मुलांच्या शाळेच्या आसपास दारू दुकाने नकोत,” हा त्यांचा मुख्य मुद्दा आहे.
महेश दादांनी या लढ्याला थेट पाठिंबा दिला असून ते म्हणाले,  “आपण समाजासाठी राजकारण करतो, दारूवाल्यांच्या फायद्यासाठी नाही!”
 “दारू दुकानं बंद न झाली, तर जनआंदोलन उभं करू!” – इशारा
दादांनी प्रशासनाला इशारा देताना स्पष्ट केलं की, “जर नागरिकांच्या विरोधानंतरही ती दुकाने बंद झाली नाहीत, तर आम्ही जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार. जनतेचा आवाज रोखता येणार नाही.”
 सकारात्मक पाऊल – काही दुकानं आधीच बंद
महेश दादांच्या हस्तक्षेपामुळे यापूर्वी काही भागांतील विवादित दारू दुकानं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढलेला आहे. “नागरिकांचा विरोध म्हणजेच अंतिम निर्णय – दारू दुकानं कायमची बंद झाली पाहिजेत!” – आमदार महेश लांडगे यांचा निर्धार