Home Breaking News हिंदी सक्तीला महाराष्ट्रात मनसेचा प्रखर विरोध! राजसाहेब ठाकरे यांचे शाळांना थेट आवाहन!

हिंदी सक्तीला महाराष्ट्रात मनसेचा प्रखर विरोध! राजसाहेब ठाकरे यांचे शाळांना थेट आवाहन!

62
0
लोणावळा | प्रतिनिधी — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी एका पत्रकार परिषदेत हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात ठाम भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना उद्देशून एक स्पष्ट, ठाम आणि मराठी अभिमान जपणारे पत्र वाचून दाखवले. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात या पत्राने खळबळ उडवली आहे.
हिंदी सक्ती म्हणजे मराठीची गळचेपी!
राजसाहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हिंदी सक्ती हा मराठी भाषेवर होणारा हल्लाच आहे. महाराष्ट्राच्या शाळांमध्ये मराठी ही अभिमानाची भाषा आहे आणि तीच प्राधान्याने शिकवली गेली पाहिजे.” यासाठीच त्यांनी एक पत्र तयार केले असून, शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यासाठी पक्षाच्या स्थानिक शाखांना निर्देश दिले आहेत.
लोणावळ्यात मनसेकडून शाळांना पत्र वितरण मोहीम
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे आणि नेते बाबू वागसकर यांच्या मार्गदर्शनानुसार लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले आणि त्यांच्या टीमने शहरातील विविध शाळांमध्ये भेट देत हे पत्र सुपूर्त केले.
मोहीमेदरम्यान मान्यवरांची उपस्थिती
या मोहिमेसाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते व पदाधिकारी:
श्री. दिनेश कालेकर (मनसे उपाध्यक्ष)
श्री. अमित भोसले (प्रवक्ते)
अभिजित फासगे (संघटक)
निलेश लांडगे, सुनील सोनवणे, संदीप बोभाटे
जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार, कैवल्य जोशी
सुभाष रेड्डी, श्रेयस केदारी, किशोर साठे, सौरभ कराळे
या सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान जोपासणारे पत्र शाळांना सन्मानाने सुपूर्त केले.
मराठी शाळांची ओळख टिकवण्यासाठी निर्णायक पाऊल!
राजसाहेबांच्या आवाहनाला लोणावळा शहरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. शाळेतील अनेक शिक्षक व पालकांनी मराठीच्या अस्मितेसाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले. मनसेच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रात भाषाविषयक जनजागृतीलाही गती मिळत आहे.
“मराठी ही मातृभाषा, अन्य कुठलीही सक्ती अमान्य!” — मनसेची भूमिका स्पष्ट
राजसाहेबांनी सांगितले की, “शैक्षणिक स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदी सक्तीला महाराष्ट्रात स्थान देणार नाही. जर सक्ती झाली, तर महाराष्ट्रभर आंदोलन उभारले जाईल.”
 पुढील टप्प्यात जिल्हास्तरीय दौरे?
सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे लवकरच राज्यभरातील शाळांना पत्र वितरित करण्यासाठी विभागनिहाय मोहीम राबवणार आहे. यामध्ये जिल्हा मनसे पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येणार आहे.