Home Breaking News वाकडमध्ये पहाटे आगीचा रौद्रावतार !६ ते ७ दुकाने जळाली; सुदैवाने जीवितहानी टळली.

वाकडमध्ये पहाटे आगीचा रौद्रावतार !६ ते ७ दुकाने जळाली; सुदैवाने जीवितहानी टळली.

9
0

वाकडमध्ये पहाटे आगीचा रौद्रावतार !६ ते ७ दुकाने जळाली; सुदैवाने जीवितहानी टळली.

अग्निशमन दलाच्या जवानांची तत्परता; भीषण आगीत जीवितहानी टळली, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
पिंपरी-चिंचवड, दि. २५ ऑक्टोबर २०२६ :
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात रविवारी पहाटे भीषण आगीची घटना घडली. प्रिस्टीन प्रो लाइफ परिसरातील ६ ते ७ दुकानांना लागलेल्या आगीत दुकानांमधील माल आणि साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) पहाटे सुमारे ३ वाजून ५६ मिनिटांनी रहाटणी उप-अग्निशमन केंद्राला आगीची माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रहाटणी, थेरगाव आणि मुख्य अग्निशमन केंद्रातील अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी होज पाईप आणि कटरच्या साहाय्याने दुकानांचे शटर तोडून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत ६ ते ७ दुकानांमधील साहित्य आणि माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.
या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने जळून खाक झाल्याने संबंधित व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून नुकसानीचा निश्चित आकडाही समोर आलेला नाही.