Home Breaking News सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पाच दिवसांत चांदी ₹११,५२१ तर सोनं ₹३,९७५ ने...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पाच दिवसांत चांदी ₹११,५२१ तर सोनं ₹३,९७५ ने स्वस्त.

35
0

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पाच दिवसांत चांदी ₹११,५२१ तर सोनं ₹३,९७५ ने स्वस्त.

पुणे : गेल्या पाच दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) तसेच देशांतर्गत सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत. विशेषतः चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली असून, विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत चांदी तब्बल ₹१ लाख ९४ हजार ५०३ प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
MCX वर ४ डिसेंबर एक्सपायरीच्या चांदीचा भाव २५ सप्टेंबर रोजी ₹२,३४,६९६ प्रति किलो होता. गेल्या शुक्रवारी हा भाव ₹२,२५,५४५ वर बंद झाला. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत चांदीच्या दरात ₹९,१५१ प्रति किलोची घट झाली.
चांदीच्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सध्याच्या दरातील घसरण आणखी मोठी आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात MCX वर चांदीने ₹४,२०,०४८ प्रति किलो असा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्या तुलनेत सध्याचा भाव तब्बल ₹१,९४,५०३ ने कमी आहे.
देशांतर्गत सराफा बाजारातही चांदी स्वस्त झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, पाच दिवसांत चांदीचा दर ₹२,३२,३५० वरून ₹२,२०,८२९ प्रति किलो झाला. म्हणजेच ₹११,५२१ प्रति किलोची घसरण झाली आहे.
दरम्यान, चांदीनंतर सोन्याच्या किमतीतही मोठी घट झाली आहे. MCX वर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव २५ सप्टेंबरला ₹१,५३,२७७ होता. गेल्या शुक्रवारी तो ₹१,५०,२५० वर आला. त्यामुळे पाच दिवसांत सोन्याच्या दरात ₹३,०२७ प्रति १० ग्रॅमची घट झाली.
देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घसरण कायम आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,५२,११३ वरून ₹१,४८,१३८ प्रति १० ग्रॅम झाला असून, पाच दिवसांत ₹३,९७५ ची घट झाली, तर २२ कॅरेट सोनं ३,२०० ने स्वत झालं आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा दर किती?

आज देशातल्या प्रमुख शहरांमध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहेत:
दिल्ली: १८ कॅरेट ₹१,१२,०४०, २२ कॅरेट ₹१,३६,९०० आणि २४ कॅरेट ₹१,४९,३३०
मुंबई: १८ कॅरेट ₹१,११,८९०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०
कोलकाता: १८ कॅरेट ₹१,११,८९०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०
चेन्नई: १८ कॅरेट ₹१,१२,३५०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०
बेंगळुरू: १८ कॅरेट ₹१,११,८९०, २२ कॅरेट ₹१,३६,७५० आणि २४ कॅरेट ₹१,४९,१८०