Home Breaking News तुकाराम मुंढे साहेब! FDA अधिकाऱ्यांनी माजवली लूट, वसुलीचे दर १० पटीने वाढले;...

तुकाराम मुंढे साहेब! FDA अधिकाऱ्यांनी माजवली लूट, वसुलीचे दर १० पटीने वाढले; संजय राऊत यांनी पत्र लिहून केला आरोप

33
0

तुकाराम मुंढे साहेब! FDA अधिकाऱ्यांनी माजवली लूट, वसुलीचे दर १० पटीने वाढले; संजय राऊत यांनी पत्र लिहून केला आरोप

सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यूबीटी खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर वसुलीच्या दरात तब्बल दहा पटीने वाढ झाली आहे. एफडीए अधिकारी नोटीस आणि कारवाईची भीती दाखवून वसुली करत आहेत. संजय राऊत यांनी पत्र लिहून हे गंभीर आरोप केले आहेत.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर विभाग पूर्ण फॉर्ममध्ये आला आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट्स व्यतिरिक्त मोठ्या ब्रँडेड कंपन्यांची गोदामे (वेयरहाऊस) पिंजून काढली आहेत. या कारवायांबद्दल तुकाराम मुंढे यांचे कौतुक होत असले, तरी उद्धव सेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एफडीए अधिकाऱ्यांवर वसुलीचा आरोप केला आहे.
मुंढे आयुक्त होण्यापूर्वी एफडीए अधिकारी नोटीसची भीती दाखवून १० ते १२ हजार रुपये उकळत असत, पण आता ७५ हजार ते दोन लाख रुपयांची उघड वसुली सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.