Home Breaking News पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद; घरफोडी, खुनाचा प्रयत्न, जबरी...

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद; घरफोडी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी आणि फसवणुकीचे प्रकार.

40
0

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद; घरफोडी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, मारामारी आणि फसवणुकीचे प्रकार.

पुणे, दि. १६ सप्टेंबर २०२६ :

पुणे ग्रामीण पोलिसांनी १६ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये विविध पोलीस ठाण्यांत दाखल झालेल्या ८ गुन्ह्यांची माहिती दिली आहे. यामध्ये घरफोडी, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, गर्दीत मारामारी, फसवणूक आणि दुखापतीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. 

यवत परिसरात मेहर ट्रेडिंग कंपनीत घरफोडी

यवत पोलीस ठाणे गु.र.नं. १४२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० ते १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत, यवत, ता. दौंड येथील स्टेशन रोडवरील मेहर ट्रेडिंग कंपनी येथे चोरी झाली. फिर्यादी शेखमल रतनचंद मेहर, वय ६७ वर्षे, व्यवसाय पशुखाद्य दुकान, रा. यवत स्टेशन रोड, नरोटा, ता. दौंड, जि. पुणे यांनी फिर्याद दिली. अज्ञात आरोपीने दुकानाचे शटर कोणीतरी उचकटून दुकानात प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील ६५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे नमूद आहे. 

 रांजणगाव गणपती येथे तरुणावर जीवघेणा हल्ला

रांजणगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ४३७/२०२६, भा.न्या.सं. कलम १०९(१) अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता, रांजणगाव गणपती, सोन्या सांगवी रोड परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी संगमेश्वर विश्वनाथ बोबनाळे, वय २७ वर्षे, व्यवसाय चालक, रा. रांजणगाव गणपती, मंगलमूर्ती शाळेजवळ, तेजस्वी उगले यांच्या खोलीत, ता. शिरूर, जि. पुणे, यांनी तक्रार दिली. आरोपी दिपक कचर खोडे, रा. लोहद पोस्ट पोचला, जि. अमरावती, याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.  

 बाबुळसर खुर्द येथे पाणी मागण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

रांजणगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ४३८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता, बाबुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे, वाळकेवस्ती, परदेशी फार्मजवळ हा प्रकार घडला. फिर्यादी सौ. माधुरी निलेश चव्हाण, वय २५ वर्षे, गृहिणी, रा. वाळकेवस्ती, निलेश वाळके यांच्या रूममध्ये, बाबुळसर खुर्द, ता. शिरूर, जि. पुणे यांनी तक्रार दिली. दोन अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आल्या. घरमालक घरी आहे का, अशी विचारणा करून त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी देत असताना एकाने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून तोडून नेले. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची किंमत ७५ हजार रुपये असून त्यात सोन्याच्या दोन वाट्या व चार मणी  आहेत.

ओतूरच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरीला

ओतूर पोलीस ठाणे गु.र.नं. २५०/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे येथील यात्रेत हा प्रकार घडला. फिर्यादी काजल प्रशांत रावळकर, वय २५ वर्षे, गृहिणी, रा. ओतूर नं. २, ता. जुन्नर, जि. पुणे यांनी तक्रार दिली. आरोपी म्हणून बकुळा नामदेव पवार, कविता किशोर काळे, संगिता नारायण पवार आणि सुमन हरिभाऊ पवार यांची नावे नोंदविण्यात आली आहेत. यात्रेतील गर्दीचा फायदा घेत आरोपींनी संगनमताने फिर्यादीच्या मुलीच्या गळ्यातील सोन्याचे पेंडंट तसेच सरला लक्ष्मण पवार यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरी केल्याचे नमूद आहे. चोरीस गेलेल्या दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत ५६ हजार रुपये आहे. 

भवानीनगर बसस्थानकावर तरुणाला मारहाण

वालचंदनगर पोलीस ठाणे गु.र.नं. २८७/२०२६ अन्वये गर्दी मारामारीचा गुन्हा दाखल आहे. भा.न्या.सं. कलम १८९(२), १९१(२), १९०, ११८(१), ११५(२), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ३७(१), ३७(३), १३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता, भवानीनगर कारखाना गेटसमोरील बसस्थानक, ता. इंदापूर, जि. पुणे येथे हा प्रकार घडला. फिर्यादी समाधान नानासो जाधव, वय ३२ वर्षे, रा. बेलवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, हे बसस्थानकावर उभे असताना ७ ते ८ अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यापैकी एकाने बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली आणि लोखंडी वस्तूने डोक्यात मारून दुखापत केली. त्यानंतर इतर ६ ते ७ जणांनी लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली.

बारामतीत शासकीय नोकरीचे आमिष दाखवून ७ लाख ८५ हजारांची फसवणूक

बारामती शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३८/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३४०(२), ३१९(२), ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी आरिफ शहाजान शेख, वय ४१ वर्षे, व्यवसाय, रा. गोलवंडी, ता. इंदापूर, जि. पुणे यांनी तक्रार दिली. आरोपींमध्ये तोसीम इब्राहिम माणियार, आयेशा तोसीम माणियार आणि शामशुद्दीन हसन माणियार यांचा समावेश आहे. आरोपींनी फिर्यादीस शासकीय नोकरी लावतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर कागदपत्रे व फोटो मोबाइल फोनवरून व्हॉट्सअॅपद्वारे मागवून व्यवहाराची आगाऊ रक्कम म्हणून ७ लाख ८५ हजार रुपये आरटीजीएस व रोख स्वरूपात घेतली आहे. 

देवळवाडीतील तरुणाची ४३ लाख ६९ हजार ६८० रुपयांची फसवणूक

यवत पोलीस ठाणे गु.र.नं. ४४३/२०२६, भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. फिर्यादी रवींद्र मोहन शेलार, वय २९ वर्षे, खासगी नोकरी, रा. देवळवाडी, ता. दौंड, जि. पुणे यांनी तक्रार दिली. आरोपी करण मनोहर गंभीरराव, रा. नागदाळ, ता. लोणावळा, जि. अमरावती आणि शुभम ज्ञानेश्वर लाकडे, रा. नांदगाव, ता. लोणावळा, जि. अमरावती अशी नावे नोंदविण्यात आली आहेत. आरोपींनी फिर्यादीकडून एकूण ४३ लाख ६९ हजार ६८० रुपये घेतल्यानंतर फोन न उचलणे, फोन बंद ठेवणे तसेच व्हॉट्सअॅपवरून पैशांची मागणी करणे, अशा प्रकारे फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

 खेडच्या वाशेरे परिसरात शेतकऱ्यावर लाकडी काठीने हल्ला

खेड पोलीस ठाणे गु.र.नं. ४६३/२०२६ अन्वये दुखापतीचा गुन्हा दाखल आहे. भा.न्या.सं. कलम ११८(२), ३२४(२), ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता, वाशेरे देशमुखवाडी, ता. खेड, जि. पुणे येथे हा प्रकार घडला. फिर्यादी निलेश अशोक देशमुख, वय ३२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. वाशेरे देशमुखवाडी, ता. खेड, जि. पुणे यांनी तक्रार दिली. आरोपी माऊली नामदेव खेंडे, वय ३२ वर्षे, व्यवसाय शेती, रा. वाशेरे देशमुखवाडी, ता. खेड, जि. पुणे याने रस्त्यावरून जात असताना फिर्यादीशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून शेजारी पडलेली लाकडी काठी डोक्यावर मारून दुखापत केली तसेच हाताच्या मनगटावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

पुणे ग्रामीण पोलिसांकडून या  घटनांचा पुढील तपास सुरू असून, प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.