Home Breaking News मतदारयादीत नाव नोंदणीची संधी; पुणे जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला...

मतदारयादीत नाव नोंदणीची संधी; पुणे जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरे.

67
0

मतदारयादीत नाव नोंदणीची संधी; पुणे जिल्ह्यात १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरे.

पुणे | १४ सप्टेंबर 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर ही शिबिरे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
प्रारूप मतदार यादीमध्ये काही नागरिकांची नावे गैरहजर,

स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. अशा पात्र नागरिकांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणाहून मतदार यादीत नाव नव्याने नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.

या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक आणि इतर पात्र नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

शिबिरांसाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.