Home Breaking News Mumbai:वर्सोवा-मध आयलंड ‘केबल-स्टे’ड’ उड्डाणपुलाला मंजुरी; ९० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १० मिनिटांत...

Mumbai:वर्सोवा-मध आयलंड ‘केबल-स्टे’ड’ उड्डाणपुलाला मंजुरी; ९० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १० मिनिटांत होणार

41
0

वर्सोवा-मध आयलंड ‘केबल-स्टे’ड’ उड्डाणपुलाला मंजुरी; ९० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १० मिनिटांत होणार मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा आणि मध यांना जोडणाऱ्या प्रस्तावित ‘केबल-स्टे’ड’ (तारांच्या आधारावर उभारल्या जाणाऱ्या) उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे.

१,२३७ खारफुटीची (मँग्रोव्ह) झाडे अडथळा ठरल्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता, परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा आणि मध दरम्यान सुमारे २,३९५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या ‘केबल-स्टे’ड’ उड्डाणपुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.