पुण्यात मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून MPSC विद्यार्थ्याचे अपहरण; ५३ मिनिटांत पोलिसांकडून सुखरूप सुटका.
पुणे: १० सप्टेंबर.
मैत्रिणीसोबत बोलतो म्हणून MPSC विद्यार्थ्याचं भररस्त्यात अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पेरुकेटजवळ झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
प्रसाद सूर्यवंशी, वय 28, हा नारायण पेठेत MPSC परीक्षेचा अभ्यास करत होता. त्यावेळी ब्लॅक फॉर्च्यूनर आणि स्कॉर्पिओमधून आलेल्या सुमारे 10 जणांनी त्याला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि पळवून नेलं.
आरोपी सागर बोराडे याच्या मैत्रिणीसोबत सतत संवाद साधल्याच्या रागातून प्रसादचे अपहरण केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं आहे. सिंहगड रोडच्या दिशेने जात असतानाही त्याला पुन्हा मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांची कारवाई: ‘डायल ११२’ वर कॉल मिळताच विश्रामबाग पोलिसांनी नाकाबंदी करून सिंहगड रोडच्या दिशेने पाठलाग करत अवघ्या ५३ मिनिटांत (रात्री १:२३ वाजता) तरुणाची सुटका केली.
कारवाई: सागर रमेश बोराडे व किशोर बाळासाहेब सावंत या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर २ फरार आरोपींचा शोध सुरू आहे


