Home Breaking News राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची पुण्यात नियुक्ती

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची पुण्यात नियुक्ती

30
0

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची पुण्यात नियुक्ती.

मुंबई | 5 सप्टेंबर 2026 :

राज्य सरकारने 3 सप्टेंबर रोजी 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पुण्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गजेंद्र बावणे यांची जीएसडीए, पुणे येथून महावितरणच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. डॉ. अपूर्वा बासुर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विशाल खत्री यांची यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. डोनुरू अनन्या रेड्डी यांची डहाणू येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पी. के. सिद्धार्थ रामकुमार यांची जव्हार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. कुश मोटवानी यांची सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आकाश वर्मा यांची गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नंदला साईकिरण यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, भंडारा म्हणून बदली करण्यात आली आहे.

योगेश कुमार मीना यांची सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती झाली आहे. तर शिवांश सिंह यांची अहेरी, गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.