पुणे ग्रामीण पोलीसच्या मंचर ,शिरूर , इंदापूर ,बारामती व यवत ठाण्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई .

पुणे ग्रामीण पोलिसांनी 23 जुलै रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांवर कारवाई करत अनेक गुन्हे दाखल केले. मंचरमध्ये खुनाच्या प्रयत्नाची घटना, शिरूरमधील मारहाण, इंदापूर व बारामतीतील चोरी, यवतमधील घरफोडी यावर कारवाई करण्यात आली. सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे
मंचर : स्क्रॅप गोदामात तरुणावर जीवघेणा हल्ला
स्क्रॅप गोदामात काम करणाऱ्या तरुणावर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून गंभीर जखमी केले. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
शिरूर : जुन्या वादातून युवकाला बेदम मारहाण
हॉटेलबाहेर चार जणांनी युवकाला अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद.
इंदापूर : कंपनीतून ₹1.49 लाखांचे लोखंडी साहित्य चोरी
सिमेंट पाइप कंपनीतून लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केले. पोलिस तपास सुरू आहे.
बारामती : MIDC गोदामातून ₹1.25 लाखांचा माल लंपास
गोदामाबाहेर ठेवलेले पाइप आणि साहित्य चोरीला गेले. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू.
यवत : घरफोडीत ₹2.70 लाखांचे दागिने व दुचाकी चोरी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल चोरट्यांनी पळवली.
सर्व प्रकरणांचा पुढील तपास सुरू आहे