Home Breaking News पुनावळ्यात PMPML बसच्या धडकेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू.

पुनावळ्यात PMPML बसच्या धडकेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू.

34
0

पुनावळ्यात PMPML बसच्या धडकेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू.

पुणे, १२ जुलै : पुण्यातील पुनावळे परिसरात PMPML बसच्या धडकेत एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आईसोबत स्कूटरवरून जात असताना बसच्या धडकेत मुलगी मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुनावळे येथील पवना ब्रिजजवळील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. फिर्यादी महिला आपल्या मुलगी खुशबू हिच्यासह स्कूटर (MH 14 LK 2362) वरून जात होत्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या PMPML बसचा (MH 12 QG 2079) चालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता.

ओव्हरटेक करताना बसचा मागील भाग स्कूटरला धडकला. त्यामुळे स्कूटरवरील आई-मुलीचा तोल गेला आणि खुशबू बसच्या मागील चाकाखाली पडली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात PMPML बस चालक सय्यद शब्बीर बुलानी (वय ३४) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टापके करत आहेत.