Home Breaking News यवतमध्ये गावठी पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ५.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

यवतमध्ये गावठी पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ५.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

31
0

यवतमध्ये गावठी पिस्तूल विक्रीचा पर्दाफाश; तीन आरोपी अटकेत, ५.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

यवत :८ जुलै २०२६; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने भांडगाव (ता. दौंड) परिसरात संयुक्त कारवाई करत अवैध गावठी पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेऊन दोन गावठी पिस्तुले, पाच जिवंत काडतुसे आणि एक चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांची तपासणी केली. त्यांच्याकडून अवैध शस्त्रे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

योगेश शंकर मारसाळे (वय २४ वर्षे)

सरज संजय रोलार (वय २६ वर्षे)

रोहित प्रमोद भुजबळ (वय २४ वर्षे)

सर्व रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे आरोपीं विरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेली शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा वापर कोणत्या गुन्ह्यांसाठी होणार होता, याचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.