Home Breaking News पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यमशाळा अनधिकृत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यमशाळा अनधिकृत.

39
0

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यमशाळा अनधिकृत.

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना शिक्षणविभागाकडून सूचना

पिंपरी, दि. १५ एप्रिल २०२६ – सन २०२६-२७ याशैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० खाजगी इंग्रजीमाध्यमाच्या प्राथमिक शाळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता अनधिकृतरित्याचालविण्यात येत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शाळांना यापूर्वीच शाळा बंद करण्याबाबतनोटीस देण्यात आलेली असतानाही या शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू ठेवण्यात आल्याआहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षणविभागामार्फत सर्व पालकांना स्पष्टपणे सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश अशाअनधिकृत शाळांमध्ये करू नये. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्याशैक्षणिक प्रगतीवर व भविष्यातील शैक्षणिक मान्यतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.त्यामुळे या बाबतीत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून, अनधिकृतशाळांमध्ये प्रवेश दिल्यास होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संबंधित पालक स्वतः जबाबदारराहतील, याची नोंद घ्यावी.

तसेच, संबंधितसर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना या निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा देण्यात येत आहेकी, शासनाची आवश्यक परवानगी प्राप्त केल्याशिवाय शाळा सुरूकरू नयेत. अन्यथा, अनधिकृतपणे शाळा सुरू ठेवूनविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण वक्रीडा विभागाच्या शासन निर्णयांनुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यातयेणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारीसंगीता बांगर यांनी दिली आहे.

तरी पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक हिताचा विचारकरून केवळ शासनमान्य व अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यातआले आहे.

अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांची यादी पुढीलप्रमाणे :

ब्लोमिंगबर्ड्स, ताथवडे

लिटीलस्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर

माऊंटएव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी

डी.एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी

मानेइंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी

नर्चरइंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी,चऱ्होली

माईंडवर्ल्डइंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी,चऱ्होली

हेम्सइंटरनॅशनल स्कूल, वाकड

कॅटलिस्टइंटरनॅशनल स्कूल, चऱ्होलीफाटा

गॅलेक्सीइंटरनॅशनल स्कूल, मोशी