स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी एकूण तीन खूनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश.
खेड: ९एप्रिल २०२६,पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड तालुक्यातील जैदवाडी येथे मार्च २०२६ च्या मध्यावर झालेल्या ३३ वर्षीय धनंजय मारुती घेवडे या तरुणाच्या निर्घृण खुनाचा छडा लावून ३५ गंभीर गुन्हे असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला अटक केली आहे .या कारवाईमुळे तीन खुनांची मालिका उघडकीस आली आहे.

राक्षेवाडीतील रहिवासी धनंजय घेवडे हे १६ मार्च २०२६ पासून बेपत्ता होते, ज्यांचा मृतदेह १८ मार्च रोजी जैदवाडीतील दुर्गम भागात कुजलेल्या अवस्थेत आढळला
खेड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ११० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे ६ दिवसांत ३५ गुन्हे नोंद असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी ललित खोल्लम राहणार शिरोली ,ता.खेड व त्यांच्या साथीदार नंदलाल दिलीप होले राहणार कोरेगाव, ता. आंबेगाव हे संशयित कॅमेऱ्यामध्ये आढळले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून दोन्ही गुन्हेगारांना वडगाव निंबाळकर येथून अटक केली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोन्ही आरोपींनी धनंजय घेवडे यांच्याशी पूर्वीच्या काही वादातून त्यांच्या लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून खून केल्याचे कबूल केले.
या सर्व गुन्ह्यात निलेश कैलास सणस यांनी त्यांना आर्थिक मदत केल्याचे पोलिसांना समजले तेव्हा त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत व्यक्तीचा मोबाईल मृत व्यक्तीला ज्या लोखंडी रॉडने व दगडाने मारहाण केली आणि आरोपीचे कपडे हे जिथे त्यांनी विहिरीमध्ये टाकले होते तेही पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
आरोपी ललित याचे यापूर्वीचे दोन गुन्हे देखील या प्रकरणामुळे उघडकीस आले आहेत. ठाणे येथे असताना आरोपी ललित याने एका तरुणास अपहरण करून त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्या तरुणाच्या आईचाही खून शिरोली येथे केल्याचे कबूल केले आहे. या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण हद्दीतील दोन आणि ठाणे शहर हद्दीतील एक असे गुन्हे खुनाचे उघडकीस आले आहेत.
आरोपी ललित खोल्लम याच्यावर खुनाचा प्रयत्न ,दरोडा,जबरी चोरी ,घरफोडी असे एकूण 35 गुन्हे सातारा ,पिंपरी चिंचवड हद्दीत दाखल आहेत यासाठी त्याच्यावर कारवाई झालेली असून तो जामिनावर बाहेर आहे.
हे सगळे मध्ये पोलिसांची चिकाटीने चौकशी व तांत्रिक कौशल्य विशेष ठरले आहे. सध्या आरोपींना न्यायालयात हजर केले असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही सर्व कारवाई अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.