Home Breaking News दुसऱ्या लग्नासाठी अडथळा ठरेल म्हणून ११ महिन्यांच्या मुलाचा खून करणाऱ्या आईस अटक;...

दुसऱ्या लग्नासाठी अडथळा ठरेल म्हणून ११ महिन्यांच्या मुलाचा खून करणाऱ्या आईस अटक; भांबर्डे येथील घटना.

49
0

दुसऱ्या लग्नासाठी अडथळा ठरेल म्हणून ११ महिन्यांच्या मुलाचा खून करणाऱ्या आईस अटक; भांबर्डे येथील घटना.

पुणे ,शिरूर Crime News: ५ एप्रिल २०२६ रांजणगाव MIDC पोलिसांनी ११ महिन्यांच्या बालकाच्या खून प्रकरणाचा धक्कादायक उलगडा केला .

 

दुसरे लग्न करण्यासाठी 11 महिन्यांचा मुलगा आड येत असल्याने त्याचा सिमेंटच्या ओट्यावर आपटून खून करीत मृतदेह बॅगमध्ये भरून विहिरीत टाकून देणाऱ्या आईला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे भांबार्डे येथील रहिवासी रविंद्र अशोक पवार यांनी दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी पूजा रविंद्र पवार (२२) ही दि. ०८ मार्च २०२६ रोजी त्यांच्या ११ महिन्यांच्या मुलगा यशसह घरातून निघून गेली होती. त्यानंतर दि. ०५ एप्रिल रोजी ती जांबुत गावच्या हद्दीत आढळून आली.

टाकळी हाजी पोलीस चौकीत चौकशीदरम्यान, पूजाने सुरुवातीला मुलगा घराच्या ओट्यावरून पडून मृत झाल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी अधिक सखोल तपास केल्यानंतर या प्रकरणामागील सत्य उघड झाले.

तपासात उघडकीस आले की, मुलगा सतत रडत असल्याने आणि भविष्यात दुसरे लग्न करण्याच्या उद्देशाने अडथळा ठरेल या विचारातून पूजाने स्वतःच्या मुलाचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरून बॅग पाण्यात बुडावी यासाठी बॅगमध्ये दोन दगड भरले. त्यानंतर बॅग शेतातील विहिरीत टाकून दिली. 

रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, फॉरेन्सिक पथक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे यांनी भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले. मृतदेह विघटित अवस्थेत आढळून आल्याने घटनास्थळीच पंचनामा व शवविच्छेदन करून अंत्यविधी करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी राजेंद्र आनंदराव पवार यांच्या तक्रारीवरून रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पूजा राजेंद्र पवार हिला दि. ०६ एप्रिल रोजी सायंकाळी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने केली.