Home Breaking News आदिवासी क्षेत्र व समुदायाचाविस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचाविस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

36
0

आदिवासी क्षेत्र व समुदायाचाविस्तृत विकासावर भर द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

पुणे, दि. 6: जिल्हाधिकारीयांनी मत्स्यव्यवसाय वृद्धिंगत करण्याकरिता धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानया सहयोजनेतर्गत पुणे जिल्ह्यातील सन 2025-26 करिता प्राप्त परिपूर्ण प्रस्तावांस पुढील कार्यवाहीस्तव मंजुरी प्रदान केलीआहे.

या बैठकीस सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसायपुणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाचे प्रतिनिधी, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहायक मत्स्यव्यवसाय विकासअधिकारी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गतमत्स्यव्यवसाय घटक वृद्धिंगत करण्याकरिता “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सह-योजना राबविण्यास शासन निर्णय क्रमांक-मत्स्यवि-1125/प्र. क्र.71/पदुम 14 दिनांक 4/9/2025 अन्वये मान्यता प्राप्त आहे.त्यानुषंगाने पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यातील99 गावांतील आदिवासी क्षेत्रातील इच्छुक लाभार्थींकडून प्रस्तावमागणीस्तव जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.त्यानुषंगाने सदर प्राप्त प्रस्तावांचीछाननी करून परिपूर्ण असलेले प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी तथा प्रधानमंत्रीमत्स्य संपदा योजना जिल्हास्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती पुढे मंजुरीस्तव मांडण्यातआले होते.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गतधरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान ही सहयोजना राबविण्यात येत असून या योजनेमध्येजिल्ह्यातील 6 तालुक्यातील 99 गावांचा धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या सहयोजनेत समावेश आहे.

आदिवासी क्षेत्र व समुदायाचाविस्तृत विकास करण्यासाठी मूळ पायाभूत सुविधा तसेच आर्थिक सबलीकरण होऊन सामाजिक प्रवाहातआणणे तसेच मत्स्य व्यवसाय वृद्धिंगत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असून जिल्ह्यात हीयोजना प्रभावीपणे राबवा, अशी सूचना जिल्हाधिकारीश्री. डुडी यांनी केली आहे