Home Breaking News मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन..

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन..

30
0

मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन….

स्थानिक रहिवाश्यांना मिळणार विविध सोईसुविधा…

पिंपरी, दि. ०६ एप्रिल २०२६ :- शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हा अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र. २३० व २३१ मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे,माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका बोऱ्हाडे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय जाधव, बाळासाहेब लांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच निलेश बोराटे,आतिश बारणे, शिवाजी बारणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असताना येथील नागरिक,युवक-युवती, महिला तसेच लहान मुलांसाठी सुसज्ज सार्वजनिक जागेची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना केवळ मनोरंजन व विरंगुळ्याचीच नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठीही मोठा आधार मिळणार आहे.असेही त्यांनी सांगितले.