नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये वाढत्या धूळ प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. १ एप्रिल २०२६ पासून सर्व बांधकाम स्थळांवर नव्या पर्यावरणीय नियमांची सक्ती करण्यात येणार आहे. वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
Commission for Air Quality Management (CAQM) आणि संबंधित राज्य सरकारांनी संयुक्तपणे हे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एनसीआरमधील दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे हवेत PM10 आणि PM2.5 कणांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
नव्या नियमांनुसार काय बदल?
-
बांधकाम स्थळांवर धूळ रोखण्यासाठी ग्रीन नेट किंवा शीटने पूर्ण आच्छादन बंधनकारक
-
नियमित पाणी फवारणीची सक्ती
-
बांधकाम साहित्य झाकून ठेवणे अनिवार्य
-
ट्रक व डंपरची चाके धुण्याची व्यवस्था
-
रिअल-टाइम एअर क्वालिटी मॉनिटरिंग यंत्रणा बसवणे
-
नियमभंग करणाऱ्यांवर दंड आणि प्रकल्प थांबविण्याची कारवाई