Home Breaking News जालना पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व अभिमानाने साजरा

जालना पोलीस मुख्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व अभिमानाने साजरा

61
0
जालना : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानात अत्यंत शिस्तबद्ध व देशभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रध्वज तिरंग्यास मानवंदना देत उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण परिसरात देशप्रेमाची आणि राष्ट्रभक्तीची भावना ओसंडून वाहत होती.
या प्रसंगी जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची विशेष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी आणि अनुभवांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमादरम्यान दिव्यांग विद्यार्थी, राष्ट्रीय पातळीवरील गुणवंत खेळाडू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी व सन्मान देण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी विद्यार्थी मित्रांनी सादर केलेली देशभक्तीपर गीतांची सादरीकरणे, विविध देशभक्तीपर देखावे, तसेच मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी आयोजित सेल्फ डिफेन्स व सायबर सुरक्षा शिबिर उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. यासोबतच सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली मल्लखांब कवायत शिस्त, ताकद आणि आत्मविश्वासाचे प्रतीक ठरली. हा सोहळा केवळ उत्सव न राहता संविधान, स्वातंत्र्य, समता, सुरक्षितता आणि राष्ट्रप्रेम यांचे सशक्त दर्शन घडवणारा प्रेरणादायी कार्यक्रम ठरला, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.