Home Breaking News पुण्यात अनेक रखडलेल्या प्रकल्पांना व उन्नत मार्गांचा विस्तारला अखेर सुरुवात...

पुण्यात अनेक रखडलेल्या प्रकल्पांना व उन्नत मार्गांचा विस्तारला अखेर सुरुवात होणार.

25
0

पुण्यात अनेक रखडलेल्या प्रकल्पांना अखेर सुरुवात होणार आहे.

45 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे येत्या महिन्याभरात भूमिपूजन होणार आहे अशी माहिती नितीन गडकरींनी शुक्रवारी दिली.

यामध्ये पुणे ते शिरूर, हडपसर-यवत, नाशिक फाटा ते खेड; तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या उन्नत मार्गांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार

पुणे शहराला वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी महत्त्वाचा कृती आराखडा जाहीर केला.

प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी ४५ हजार कोटींचे प्रकल्प राज्य सरकारला सादर केले होते.  आता चार प्रकल्पांचे काम  काही दिवसात  सुरू केले जाणार आहे. त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वेळा घेण्यास सांगितले आहे. या चारही प्रकल्पांचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ  यांच्या मार्फत केले जाणार आहे.