Home Breaking News अथक प्रयत्नानंतर चाकण उत्तर पोलीसांनी केला अनोळखी इसमाचे खुनाचा गुन्हा उघड.

अथक प्रयत्नानंतर चाकण उत्तर पोलीसांनी केला अनोळखी इसमाचे खुनाचा गुन्हा उघड.

36
0
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हदीतील चाकण उत्तर पो.स्टे. अंर्तगत असलेल्या मौजे बिरदवडी गावचे स्मशानभुमीच्या मागील ओढया लगत मोकळया जागेत दि. 11/01/2026 रोजी एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 25 ते 30 वर्षे यास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन कोणत्यातरी धारदार हत्याराने डोक्यावर मारुन त्याची ओळख पटु नये म्हणुन त्याचे चेह-यावर दगडाने मारुन चेहरा छिन्न विछीन्न करुन त्याचा खुन करुन त्याचे खिशातील मोबाईल, ओळखपत्र व इतर वस्तु अज्ञात आरोपीने घेवुन गेल होते. या बाबत चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 47/2026 बी. एन. एस. कलम 103 (1) प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा नोंद आहे.
गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने वरीष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे चाकण उत्तर पोलीस स्टेशन ये तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी गुन्हयाचा तपास करत असताना घटनास्थळ परीसरातील सी.सी.टी. व्ही. तसेच परीसरातील लोक कंपन्यातील कामगार कामगार अड्डे यांना मयताचा फोटो दाखवुन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला तसेच नजिकचे व इतर पोलीस स्टेशनचे मिसींग चेक करून मयताचे फोटोचे भित्तीपत्रके परीसरात लावुन, सोशल मिडीया व वृत्तपत्राचे मार्फतीने मयताचा व त्याचे वाली वारसांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
खुन झालेल्या घटनास्थळावर मिळुन आलेले भौतीक पुराव्या वरुन गुन्हयातील आरोपी याचा शोध घेवुन गुन्हयातील मोपेड गाडीबाबत माहीती मिळालेने त्याचा शोध घेवुन त्या गाडी मालकाकडे चौकशी करता त्यांने त्याचा मित्र आरोपी क्रं. 1) निखील नानासाहेब चव्हाण वय 21 वर्षे, रा. खराबवाडी ता.खेड जि.पुणे. मुळ रा. काथनेश्वर पो.धसाडी ता. गंगाखेड जि. परभणी यास दि.07/01/2026 रोजी गाडी वापरण्यास दिल्याचे सांगीतल्याने आरोपी क्रं. 01 याचा शोध घेवुन त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मयत नामे मुंजा धोंडीबा नरहिरे वय 25 वर्षे, रा. गंगाखेड जि. परभणी याचे व त्याची आई आरोपी महीला नामे 3) उषा नानासाहेब चव्हाण वय 40 वर्षे, रा. गंगाखेड जि.परभणी हिचे अनैतीक संबंध होते. मयत सध्या तिला त्रास देत असल्याने आरोपी क्रं. 01 यांनी त्याचा मित्र आरोपी क्रं. 2 ) स्वप्नील नरहरी पारधी वय 19 वर्षे, रा. रा. खराबवाडी ता.खेड जि.पुणे. मुळ रा. ढोकी ता. जि. नांदेड यास त्या बाबत सांगीतले होते. तेंव्हा आरोपी क्रं. 01 ते 03 यांनी मयतास गंगाखेड येथुन चाकण येथे बोलावुन घेवुन त्याचा खुन करण्याचा कट रचला व त्यास दि. 07/01/2026 रोजी सकाळी चाकण येथे बोलावुन घेवुन त्यास मोटार सायकल वर बसवुन दारु पिण्याचे बहाण्याने मौजे बिरदवडी गावचे हद्दीतील स्मशानभुमीच्या मागील ओढया लगत निर्मनुष्य ठिकाणी नेवुन तेथे दारु पित असताना आरोपी क्रं. 01 व 02 यांनी मयतास कोयत्याने डोक्यात तोंडावर मारहान करुन खुन केला व त्याची ओळख पटु नये या करीत त्याचे डोक्यात डगड घालुन चेहरा छिन्न विछिन्न करुन त्याचे जवळील सर्व चिज वस्तु काढुन घेवून गेले.
सदर मृतदेहची ओळख पटवण्याकरीता कोणतीही पुरावा नसताना चाकण उत्तर पोलीस स्टेशन कडील अधिकारी व तपास पथकातील अमलदार यांनी वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सलग 20 दिवस अहोरात्र कौशल्य पुर्ण तपास करुन गुन्हयातील अज्ञात मयताचा शोध घेवुन गुन्हयातील वरील 03 आरोपींना अटक करुन अंत्यंत क्लिष्ट गुन्हा उघड केला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ – 3 मारुती जगताप, सहा. पोलीस आयुक्त श्री. सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, सपोफौ सुनिल शिंदे, पो.ह. / भैरोबा यादव, प्रितम ढमढेरे, योगेश कोळेकर, पो.शि./ शिवाजी लोखंडे, महेश कोळी, शरद खैरनार, सुमित जगझाप यांनी केला आहे.