Home Breaking News “बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे परिवर्तनाचे आवाहन

“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे परिवर्तनाचे आवाहन

30
0
पिंपरी–चिंचवड : “मी आहे – ॲड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक शिक्षित महिला, कायद्याची जाण असलेली वकील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव उभी राहणारी कार्यकर्ती,” असे ठाम शब्दांत सांगत प्रभाग २५ (क) मधील प्रचारसभेत अॅड. राधिका कुलकर्णी यांनी नागरिकांच्या मनाला थेट हात घातला. त्यांच्या भाषणात आत्मविश्वास, संवेदनशीलता आणि परिवर्तनाची ठाम दिशा स्पष्टपणे जाणवत होती.
“बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याची!” हा संदेश देत त्यांनी सांगितले की, “आता थांबायची वेळ संपली आहे. आता बदल घडवण्याची वेळ आली आहे.” वर्षानुवर्षे प्रभागात प्रलंबित असलेल्या पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिलांची सुरक्षितता आणि मुलांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यांनी विकासाची नवी दिशा मांडली.
नागरिकांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, “माझ्या या प्रवासात मला तुमचा विश्वास हवा आहे, तुमचा पाठिंबा हवा आहे आणि तुमचा एक मताचा हात हवा आहे. हा मताचा हात केवळ मला नव्हे, तर आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा आहे.” त्यांच्या या भावनिक शब्दांनी सभागृहात उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांत आशेची चमक दिसून आली.
१५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करून विकासाला संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले. “चला, एकत्र येऊया… नवे नेतृत्व घडवूया… आणि आपल्या प्रभागाचा नवा विकासाचा अध्याय सुरू करूया!” या घोषणेने संपूर्ण परिसरात उत्साहाची लाट उसळली.
सुशिक्षित, अभ्यासू आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेले नेतृत्व म्हणून अॅड. राधिका कुलकर्णी यांच्याकडे नागरिक आशेने पाहत आहेत. त्यांच्या शब्दांतून केवळ प्रचार नव्हे, तर प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा ठाम निर्धार स्पष्टपणे दिसून येतो. प्रभाग २५ (क) मध्ये आता “बदल” हा केवळ शब्द न राहता, एक चळवळ बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.