Home Breaking News क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग! दोन मजली बाटा शोरूम जळून खाक

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग! दोन मजली बाटा शोरूम जळून खाक

19
0
मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. दोन मजली बाटा शोरूममध्ये ही आग लागल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली आणि काही मिनिटांतच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवण्याचे काम सुरू केले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्यापपर्यंत नाही. मात्र, दुकानातील मोठ्या प्रमाणावर मालसामान जळून खाक झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे क्रॉफर्ड मार्केट परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिसांनी परिसर बंदिस्त करून गर्दीवर नियंत्रण आणले आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
मुंबईत अलीकडेच अशा प्रकारच्या आगीच्या घटना वारंवार घडत असल्याने अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी नियमित तपासणी आणि सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.