Home Breaking News अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा हात! आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹21 लाखांची...

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा हात! आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ₹21 लाखांची देणगी सुपूर्द

71
0
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये उदारहस्ते योगदान देत सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श उभा करण्यात आला आहे. ‘न्यू जयभारत शिक्षण प्रसारक मंडळ’च्या वतीने आमदार राजेश पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ₹21,00,000 (एकवीस लाख रुपये) इतक्या देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
ही देणगी विशेषतः अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उदात्त उपक्रमाचे कौतुक करत आमदार राजेश पवार आणि त्यांच्या संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
फडणवीस म्हणाले की, “अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमुळे राज्यात एकात्मता आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ होते. संकट काळात समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन मदत केली तर कोणतीही आपत्ती मोठी राहत नाही.”
आमदार राजेश पवार यांनी सांगितले की, ‘न्यू जयभारत शिक्षण प्रसारक मंडळ’ ही संस्था शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे.
या कार्यक्रमावेळी उपस्थितांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सरकारतर्फे त्यांना मदत पुरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.