Home Breaking News लोणावळ्यात महिला मंडळाच्या वतीने मोफत गरबा प्रशिक्षण; ९० महिला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग, नवरात्रीची...

लोणावळ्यात महिला मंडळाच्या वतीने मोफत गरबा प्रशिक्षण; ९० महिला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग, नवरात्रीची रंगत वाढवली

192
0
लोणावळा : नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील महिला मंडळाने महिलांसाठी आणि मुलींसाठी खास मोफत गरबा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. महिला मंडळाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात जवळजवळ ८० ते ९० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ३० वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या विविध वयोगटातील महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आणि आनंददायी वातावरणात गरब्याचे कौशल्य आत्मसात केले.
या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन प्रेम मनिषा चेतनकुमार बंबोरी आणि नेहल नीलम निलेश गुप्ता यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षणामुळे सर्व महिला सहजतेने विविध गरबा स्टेप्स शिकू शकल्या. संपूर्ण हॉलमध्ये ताल, उत्साह आणि आनंदाची लहर पसरली होती.
नवरात्रीपूर्वी महिला मंडळाने मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केल्यामुळे सर्व सहभागी महिला अत्यंत आनंदी व समाधानी होत्या. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, एकता आणि उत्सवाचे वातावरण अधिक दृढ झाले.
या यशस्वी उपक्रमामध्ये महिला मंडळाच्या ज्येष्ठ सल्लागार सौ. अश्विनी धारप, सौ. अर्चना कुलकर्णी, सौ. जयश्री मेहता यांनी मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अध्यक्षा सौ. मनीषा बंबोरी, उपाध्यक्षा सौ. उमा मेहता, सौ. मेधा वैद्य, सचिव सौ. प्रतिमा खळदकर, सहसचिव सौ. मीनाक्षी गायकवाड, खजिनदार सौ. सुनीता रावण आणि सहखजिनदार श्रुतिका राणे यांनी केले.
महिला मंडळाने घेतलेला हा उपक्रम सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महिलांच्या सहभागाची नवी ओळख निर्माण करणारा ठरला. नवरात्रीचे सोहळे आता अधिक रंगतदार आणि ऊर्जा-भरलेले होणार आहेत, असा विश्वास महिलांनी व्यक्त केला.