मुंबईच्या गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात आज एक ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळाले. शहराच्या इतिहासात प्रथमच मराठा समाजाकडून कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परंपरा, ताकद आणि संस्कारांची झलक दाखवणाऱ्या या कुस्ती स्पर्धेमुळे मराठ्यांचा आवाज संपूर्ण मुंबईत दुमदुमला.
या स्पर्धेत अनेक राज्यातील नामांकित पहलवानांनी सहभाग घेतला. दमदार डावपेच, अंगावर काटा आणणारी झुंज आणि मराठा तरुणांचा जोश पाहून उपस्थित नागरिक भारावून गेले. “ही केवळ कुस्ती नाही, हा मराठा शक्तीचा आणि आमच्या अस्मितेचा लढा आहे,” असे अनेकांनी भावनिक शब्दांत सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत सरकारकडे संतप्त मागणीही करण्यात आली. उपस्थितांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रस्त्यावर बैल आणि रेडा उभे राहू शकतात, पण आम्ही मराठे CSMT सारख्या ठिकाणी आपला आवाज बुलंद करू शकतो. त्यामुळे सरकारने तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा.”
ही स्पर्धा केवळ क्रीडा नाही, तर मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्याला दिलेला नवा आयाम असल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठा बांधवांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. “मुंबईत पहिल्यांदाच CSMT येथे मराठ्यांची कुस्ती स्पर्धा; आरक्षणासाठी फडणवीस सरकारला दिला इशारा”